महत्वाच्या बातम्या

 ग्रामीण भागाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर


- ५ कोटी रुपयातून बनणार पादंण रस्ते, ग्रामीण भागातील विकासकामांना मिळणार गती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांने चंद्रपूर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने १० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतील ५ कोटी रुपयातून ग्रामीण भागातील पादंण रस्ते तयार करण्यात येणार असून ग्रामीण भागात मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे.

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाअंतर्गत मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्या जात आहे. यात मतदार संघातील ११ अभ्यासिका, विविध भागात समाज भवन, यासारखे कामे केल्या जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरु असुन या भागात विविध विभागाअंतर्गत मोठा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे.

दरम्याण ग्रामीण भागातील पादंण रस्ते व इतर विकासकामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती. या मागणी पाठपूरावा त्यांच्या वतीने सातत्याने सुरु होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने मतदार संघातील ग्रामीण भागासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून धानोरा येथील सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थानच्या जागेवर समाजभवनाच्या बांधकामासाठी ५० लक्ष रुपये खर्च केल्या जाणार आहे. तर खुटाळा येथे तुकडोजी महाराज सभागृहाच्या बांधकामासाठी ४० लक्ष रुपये, नकोडा येथे समाज भवनासाठी २० लक्ष रुपये, चिंचाडा येथे रोडचे बांधकाम करण्यासाठी ३० लक्ष रुपये, ताडाळी येथील पादंण रस्त्यासाठी ३० लक्ष रुपये, येरुड येथील पादंण रस्त्यासाठी ३० लक्ष रुपये, पिपरी येथील समाज भवनासाठी 30 लक्ष रुपये, येरुड येथे समाज भवन बांधण्यासाठी ३० लक्ष रुपये, पिपरी येथील मारडा पादंण रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी ३० लक्ष रुपये, सोनेगाव येथील रस्त्याच्या बांधकामासाठी ३० लक्ष रुपये, सोनेगाव येथील पादंण रस्त्यासाठी ६० लक्ष रुपये, म्हातारदेवी येथील रस्त्याच्या खडीकरणासाठी ३० लक्ष रुपये, सिदुर येथील पादंण रस्त्यासाठी ३० लक्ष रुपये, मोरवा येथील पादंण रस्त्यासाठी ३० लक्ष रुपये, पिपरी येथील पादंण रस्त्यासाठी ३० लक्ष रुपये, नागाडा येथील पादंण रस्त्यासाठी ३० लक्ष रुपये खर्च केल्या जाणार आहे. तर उर्वरित निधीतून ग्रामीण भागातील इतर विकासकामे केल्या जाणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos