रेपनपल्लीजवळ ट्रक उलटला, चालक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
आलापल्ली - सिरोंचा मार्गावरील रेपनपल्ली गावाजवळील वळणावर लोखंडी पाईप वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
लोखंडी पाईप घेवून जात असलेल्या ट्रकचालकाचे रेपनपल्लीजवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात चालक जखमी झाला. त्याला अहेरी येथील रूग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-10


Related Photos