बोलेपल्ली येथे कार्यरत राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाचा आकस्मिक मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे कार्यरत राज्य राखीव पोलिस दल क्रमांक १४ च्या तुकडीतील जवानाचा आकस्मिक मृत्यृ झाल्याची घटना काल ९ मे रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.
रामदास धुळगुंडे असे मृतक जवानाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत रामदास धुळगुंडे हे रात्री अचानक चक्कर आल्याने कोसळले. त्यांना लागलीच मुलचेरा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
रामदास धुळगुंडे हे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेंडू येथील रहिवासी होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-10


Related Photos