औषधांसोबत माणुसकीचीही सेवा : जागतिक केमिस्ट दिनी जिल्ह्यात फळवाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जागतिक केमिस्ट दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बल्लारपूर, राजुरा आणि गडचांदूर येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संघटनेचे जिल्हा संघटन सचिव प्रशांत गोठी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालये आणि वृद्धाश्रमात फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. बल्लारपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम तसेच ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. यावेळी बल्लारपूर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष निशीकांत खैरे, सचिव ब्रिजेश उईके आणि स्वीकृत सदस्य प्रतीक चौकसे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालयात फळवाटपाचा उपक्रम घेण्यात आला. राजुरा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास रेगुंडवार आणि सचिव रोकेश अल्लुरवार यांच्या उपस्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना फळे वितरित करण्यात आली. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातही फळवाटप करण्यात आले.
गडचांदूर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देवतळे आणि सचिव विनोद चटप यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. औषध विक्री आणि वितरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची सेवा करणाऱ्या केमिस्ट बांधवांनी सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविला. जागतिक केमिस्ट दिनाच्या निमित्ताने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींप्रती आपुलकी व्यक्त करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.




Petrol Price




