महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


६ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१८६० : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

१८८८ : महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.

१९१२ : भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

१९१३ : दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

१९५४ : मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.

१९९६ : अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

१९९९ : विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.

२००१ : संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२०१२ : बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

६ नोव्हेंबर जन्म

१८१४ : सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १८९४)

१८३९ : प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ भगवादास इंद्रजी यांचा जन्म.

१८६१ : बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९)

१८८० : निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७)

१८९० : कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्म.

१९०१ : जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत श्री. के. क्षीरसागर यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

१९१५ : चित्रपट कथाकार, दिगदर्शक दिनकर द. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २००५)

१९२६ : पत्रकार,कथाकार,कादंबरीकार प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा मुंबई येथे जन्म.

१९२६ : अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर २०१२)

१९६८ : याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.

१८५१ : डो जोन्स एंड कंपनीचे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचा जन्म (मृत्यू : ४ डिसेंबर १९०२)

१५५० : स्वीडनची राणी करिन मॅन्सडॉटर यांचा जन्म (मृत्यू : १३ सप्टेंबर १६१२)

६ नोव्हेंबर मृत्यू

१७६१ : मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन.

१८३६ : फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १७५७)

१९८५ : प्रसिद्ध अभिनेते संजीवकुमार यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९३८)

१९८७ : मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक, लेखक आणि पीडीए (प्रोग्रेसिव डॅूमॅटिक असोसिएशन) चे संस्थापक प्रा.भालबा केळकर यांचे पुणे इथे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९२०)

१९९२ : संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांचे पुणे इथे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१६)

१९९८ : कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)

२००२ : स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.

२०१० : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)

२०१३ : भारतीय शेफ तरला दलाल यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९३६)

चआजचे दिनविशेष





  Print






Related Photos