महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठातील पीएच.डी संशोधन प्रक्रियेतील अडचणी सोडवा : गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचा यशस्वी पुढाकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात सामाजिक शास्त्र, विज्ञान तंत्रज्ञान वाणिज्य व आंतरविद्या शाखेमध्ये संशोधनाच्या अनेक संधी असून ग्रामीण, आदिवासी होतकरू विद्यार्थी विविध विषयात संशोधन करीत आहेत मात्र, पीएच.डी संशोधक प्रक्रियेत संशोधन विद्यार्थी, मार्गदर्शक, संशोधन केंद्र यांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने या अडचणी सोडवण्याच्या संदर्भात गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांचे सोबत नुकतीच बैठक घेऊन या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

सदर बैठकीमध्ये संशोधन प्रक्रियेतील अनेक अडचणी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष व विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे आणि संघटनेचे सचिव व विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक गोरलावार यांच्याद्वारे सादर करण्यात आल्या. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos