मनपातर्फे निघणार तिरंगा रॅली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता तिरंगा रॅली काढली जाणार असुन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा हस्ते सदर रॅलीस हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य मनपातर्फे विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. तिरंगा रॅलीद्वारे नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ केला जाणार आहे.
शहरातील छोटुभाई पटेल शाळा, एफईएस गर्ल्स, सिटी कन्या, हिंदी सिटी, सिटी माध्यमिक लोकमान्य टिळक विद्यालय, लोकमान्य शाळा, न्यू इंग्लीश, किदवई तसेच नूतन माध्यमिक अशा १० शाळा या रॅलीत सहभागी होणार आहेत. शाळेतील मोठ्या मुलांचा रॅलीत सहभाग राहणार असुन ही सर्व मुले हातात राष्ट्रध्वज धरून मनपा कार्यालय गांधी चौक येथुन आझाद बगीचापर्यंत मार्गक्रमण करणार आहेत. आझाद बगीचा येथे रॅलीचा समारोप होणार असुन त्यानंतर हातात माती घेऊन पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे.
News - Chandrapur