महत्वाच्या बातम्या

 दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग : रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. रुग्णालयातील इमर्जन्सी विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या ८ बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, आगीमुळे दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पाहायला मिळाले. यामुळे रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र सर्व रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी आलेली नाही. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याआधी जून २०२१ मध्ये एम्स रुग्णालयामध्ये आगीची घटना घडली होती. गेट नंबर दोनच्या जवळ असणाऱ्या कन्वर्जन ब्लॉकच्या नवव्या मजल्यावर आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले होते. या आगीमध्ये स्पेशन कोरोना लॅबमध्ये ठेवण्यात आलेले सँपल जळून खाक झाले होते.





  Print






News - World




Related Photos