महत्वाच्या बातम्या

 जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोंद


-  एकुण २४ लाख ९० हजार रू. चा मुद्देमाल जप्त : पोलीस स्टेशन सावनेरची कारवाई

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : ०५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ पो.स्टे. सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असता काही इसम पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत खापा ते पाटनसावंगी रोडने अवैध जनावरे घेवुन येत आहे. 

अशी गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाल्याने रेल्वे क्रॉसिंग जवळ नाकाबंदी केली असता १) आयसर क्र. एम. एच. - ४० / सी.डी. - २४२० २) पिकअप क्र. एम. पी. २८ जी. ४२८९ ३) पिकअप क्र एम. एच. ४० / ए.के. - ४२३१ अशी तिन वाहने यांची पाहणी केली केली असता १) आयसर क्र. एम. एच. - ४० / सी.डी. २४२० चे चालक आरोपी महेष सेवकराव जाधव (४६) रा. वार्ड क्र. १२ राजना छिंदवाडा त्याचे ताब्यातील वाहनाचे मागचे भागाचे डाल्यामध्ये १५ म्हशी किमती अंदाजे ३ लाख रुपयाचे कोबुन कमी जागेमध्ये निर्दयतेने दोरांनी बाधुन दिसुन आल्या २) पिकअप वाहन क्र एम. पी. २८ / जी. - ४२८९ चा चालक आरोपी सतिश सेवाराम भलावी (२२) रा. नजरपुरा ता. बिछवा जि. छिंदवाडा त्याचे ताब्यातील वाहनातील डाल्यामध्ये ५ म्हषी किंमती अंदाजे १ लाख रु. ३) बोलेरो पिकअप क्र. MH-४० AK ४२३१ चा चालक आरोपी रोशन आसाराम महापुरे (२२) रा. बिरसानगर नागपूर याने आपले वाहनात ४ म्हशी व एक काळया रंगाचा म्हशीचा बछडा किंमती अंदाजे ९० हजार रु. या जनावरांची कोणतीही व्यवस्था नसतांना, निर्दयतेने कुरतेने कमी जागेमध्ये कोंबुन दोरांनी बांधुन धोकादायकरित्या विनापरवाना सदर आरोपी वाहतुक करतांना दिसुन आले. आरोपीतांच्या ताब्यातून एकुण जनावरे २४ म्हशी व एक बछड़ा किंमती अंदाजे ४ लाख ९० हजार रू. असा एकुण वाहनासह २४ लाख ९० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीतांविरूद्ध पोलिस स्टेशन सावनेर येथे कलम ११ (१) (ए) (डी), (ई), (एफ), (आय) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शरद भस्मे मो. नं. ९७६४९४६८०८ हे करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावनेर येथील ठाणेदार रविंद्र मानकर, पोलीस हवालदार योगेश्वर झोडापे, पोलीस शिपाई नागरगोजे यांनी पार पाडली.





  Print






News - Nagpur




Related Photos