महत्वाच्या बातम्या

 वीज बिलावर लावलेले अतिरिक्त शुल्क मागे घ्या अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू : राजू झोडे यांचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : महागाईने गांजलेल्या सर्वसामान्यांचा उरलासुरला खिसाही पुरता साफ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने वीज दरवाढ व अतिरिक्त शुल्क लावल्याने जणू शॉकच सामान्य जनतेला देण्याचे ठरवले आहे काय? असा प्रश्न उपस्थित करत वीज बिलावर लावलेले अतिरिक्त शुल्क मागे घ्या अन्यथा चंद्रपुर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा गंभीर इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.

इंधन समायोजन आकार व विविध कर वसुलीच्या नावाखाली परवानगी आणि त्यातही सर्वच वीज कंपन्यांनी दरवाढ करून सर्वसामान्य नागरिक, शेतमजूर, उद्योजक यांना दर महिन्याला २००-३०० रुपयांचा शॉक सरकारने दिला आहे. एकीकडे देशात दिल्ली व पंजाब राज्यात नागरिकांना २०० ते ३०० युनिट वीज मोफत दिली जाते. तेच आपल्या महाराष्ट्रात का घडू शकत नाही? असा प्रश्न राजू झोडे यांनी उपस्थित केला आहे. वीज महामंडळावरील कर्जाचा डोंगर सामान्य माणसामुळे झालेला नाही. त्यास महामंडळाची यंत्रणाच जबाबदार आहे.

जर विजेची चोरी व गळती कागदोपत्री घोडे न नाचवता नियंत्रणात आणली तर सहज नागरिकांनाही दिली,पंजाबप्रमाणे दिलासा मिळू शकतो, पण सरकार तसे विचार करू शकत नसून सर्वसामान्य नागरिकांचा गळा घोटण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळं वीज बिलावर लावलेले अतिरिक्त शुल्क मागे घ्या, वीज बिल कमी करा अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos