महत्वाच्या बातम्या

 आज उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी नागपूर सज्ज


- नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी : एनएडीटीचा प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज ४ ऑगस्ट २०२३ रोजी नागपूरच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारी 3 वाजता त्यांचे शहरात आगमन होणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात तसेच राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) वार्षिक प्रणिती कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी नागपूर सज्ज झाले आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही उद्या नागपूरमध्ये आगमन होणार आहे.

उपराष्ट्रपती आज दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहे. दुपारी ३.३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ५.३० वाजता ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एनएडीटीमध्ये सायंकाळी ५.३० नंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या या प्रबोधिनीमध्ये ते जवळपास तीन तास असतील. रात्री ९.२० वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे सहा तास उपराष्ट्रपती नागपूरात असणार आहेत. दोनही कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त असून दोन्ही कार्यक्रम निमत्रितांसाठी आहे.

राज्यपाल रमेश बैस -

आजच्या उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यांसाठी राज्यपाल रमेश बैस यांचे आज ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. रायपूर येथून ते नागपूर येथे रेल्वेने पोहचतील. दुपारी १२.३५ ला ते राजभवनला पोहचतील. आज होणाऱ्या दोनही कार्यक्रमात ते सहभागी होणार असून रात्री राजभवनात ते मुक्कामी असणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ९ वाजता मुंबईसाठी ते रवाना होतील.





  Print






News - Nagpur




Related Photos