महत्वाच्या बातम्या

 समृद्धी सह तीन महामार्गांवर महावितरण उभारणार ५० चार्जिंग स्टेशन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महावितरण कंपनीने नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस-वे यासह तीन अन्य मोठ्या महामार्गांवर ई-वाहनांसाठी ५० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक-जळगाव व पुणे-कोल्हापूर हे अन्य तीन महामार्ग आहेत.

कंपनीने राज्य सरकार, राज्य रस्ते विकास महामंडळ व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्र लिहून याकरिता जमीन मागितली आहे.

महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषण व देशाचे आयात इंधनावरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार ई-वाहनांना प्रोत्साहन देत आहे; परंतु सध्या ई-वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे ई-वाहने घरीच चार्ज करावी लागत आहेत किंवा मोजक्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या चार्जिंग स्टेशन्सवर वाहने घेऊन जावी लागत आहेत. परिणामी, महावितरणने राज्यातील मोठ्या महामार्गांवर चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात चार चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. याशिवाय, आतापर्यंत अनेक ग्राहक घरगुती वीज वापरून ई-वाहने चार्ज करीत होते. घरगुती विजेचे दर वाहन चार्जिंगच्या वीजदरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या रकमेचे बिल येत होते. परिणामी, महावितरणने वाहन चार्जिंगकरिता ग्राहकांना दुसऱ्या वीज जोडणीचा पर्याय दिला आहे. ई-वाहनांना प्रोत्साहन देणे, हा यामागील उद्देश आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos