पुलवामा मधील भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या वीर जवानांसाठी देसाईगंज येथील नागरिक सरसावले


- ७५ हजारांचा निधी केला गोळा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
पुलवामा हल्ल्यात शाहिद झालेल्या  सैनिकांच्या स्मरणार्थ २२ मार्च रोजी देसाईगंज येथे  विशेष कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांनी ज्योत प्रज्वलीत करून सर्व शहिदांना आदरांजली अर्पण केली. यावेळी भारतमातेच्या प्रतिमा व वीर अमर जवान ज्योती पुढे पुष्पचक्र अर्पण करुन मान्यवरांसह अनेक नागरिकांनी सन्मानपूर्वक मानवंदना अर्पण केली. देसाईगंज येथील नागरिक जवानांच्या स्मरणार्थ मदतीसाठीही सरसावले. 
 यावेळी शहीद स्मृती मंचावर सी.आर.पी.एफ. चे चीफ इन कमांडन्ट प्रभाकर त्रिपाठी , सेकंड इन कमांड  चांचाल  , डेप्युटी कमंडन्ट    पवार  , इन्स्पेक्टर राकेश सक्सेना , सब इन्स्पेक्टर रामलु  आदींची उपस्थिती होती.
 प्रारंभी सी.आर.पी.एफ. १९१ च्या वतीने तयार केलेल्या मंचावर वीर अमर ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. या अमर ज्योतीला सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन वीर शहीदांना अभिवादन केले. याप्रसंगी मान्यवरांसह उपस्थितांनी दोन मिनीट मैन पाळून वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. मनोगत व्यक्त करताना  त्रिपाठी म्हणाले , देसाईगंज शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांनी शहिद जवानांना ज्याप्रमाणे मान सम्मान दिला आहे व त्यांचा कुटुंबियांच्या मदतीसाठी वडसा तालुक्यातील संपूर्ण नागरिक शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी ज्यांनी सहकार्य केले त्यासाठी आभार व्यक्त केले.  यानंतर वडसा शहराच्या उन्नतीसाठी होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सी.आर.पी.एफ. १९१ बटालियन सदैव आपल्या सोबत सहभागी असेल असा विश्वास त्यांनी यावेळेस दाखविला.
   आपल्या प्राणाची पर्वा न करता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व देशाच्या रक्षणासाठी जो प्रामाणिक प्रयत्न करतात. आपले कर्तव्य बजावत असताना कुठलाही विचार न करता २४ तास सीमेवर कटिबद्ध असतात. अशा या वीर जवानांवर  १४ फेब्रुवारी ला जम्मू कश्मीर राज्यातील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या भारतीय वीर जवानांच्या कुटुंबियांना देसाईगंज येथील ३३ शाळा महाविद्यालयानी व ४ नागरिकांनी एकूण ७५ हजार  रुपये निधी गोळा केला व तो निधी आर्थिक सहाय्यता म्हणून देसाईगंज येथील १९१ बटालियनचे चीफ कमांडन्ट  प्रभाकर त्रिपाठी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी देसाईगंज येथील नगरसेवक गणेश फाफट, माजी प्राचार्य नारायण वैद्य , समाजसेवक विजय ठकराणी , भास्कर डाबरे व शहरातील प्रचंड नागरिक उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-23


Related Photos