महत्वाच्या बातम्या

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्यावतीने २५ जुलै २०२३ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यांत आलेले होते. सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये स्वतंत्र मायक्रो फायनान्स्‍ा, गडचिरोली ही कंपनी उपस्थित होती. 

सदर कंपनीने २५ जुलै २०२३ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली शासकीय संकुल बॅरेक न. २ पोलीस मुख्यालयासमोर, येथे उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये ३९ उमेदवार उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची मुलाखती घेऊन त्यापैकी ०६ उमेदवारांची अंतिम निवड केली, व त्यांना ऑफर लेटर देण्यांत आले. 

प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी जिल्हा कौशल्य्‍ विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन्‍ केंद्र, गडचिरोली कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी सहकार्य केले. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos