महत्वाच्या बातम्या

 ओव्हर बर्डनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्यांना १ लाख रुपये एकरी वेकोलिकडून मदत द्या : नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा


- आमदार प्रतिभा धानोरकर यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात नैसर्गिक पूरपरिस्थिती कमी उद्भवत असून वेकोलीमुळे कृत्रिम पूरपरीस्थितीती निर्माण होत आहे. त्यामुळे वेकोलिच्या ओव्हर बर्डनमुळे वरोरा - भद्रावती सह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थितीमुळे शेतपिक वाहून गेले आहे. शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले आहे.

त्यामुळे ओव्हर बर्डनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्यांना १ लाख रुपये एकरी वेकोलिकडून मदत द्या तसेच पांदण रस्त्याकरिता ओव्हर बर्डन चे मटेरिअल वापरण्याची परवानगी द्या अशी लोकोपयोगी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेतली. त्यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे देखील उपस्थित होते. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. परंतु जिल्ह्याच्या विकासाकरिता वरदान असलेल्या तरी शेतकरी बांधवांकरिता ह्या खाणी शाप ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वेकोलिकडे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे वेकोलि कुठेही ओव्हर बर्डनची साठवणूक करीत असतात. या ओव्हर बर्डनमुळे नदी नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात देखील बदल झाला आहे. हा देखील गंभीर विषय असून नदी नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे कठोर कारवाई झाली पाहिजे.

त्यामुळे जास्त पाऊस आल्याने शेतीतील पिके देखील वाहून जातात. त्यामुळे लाखो रुपयांचे पीक शेतकऱ्यांचे वाहून जातात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ओव्हर बर्डन मुळे पिके वाहून गेलेली आहेत. अश्या शेतकऱ्यांना तात्काळ वेकोलिकडून १ लाख रुपये निधीची मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार धानोरकर यांनी केली आहे.






  Print






News - Chandrapur




Related Photos