महत्वाच्या बातम्या

 जिल्हा सैनिक कार्यालयात कारगील विजय दिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा सैनिक कार्यालयात कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शगजेंद्र बालपांडे, उपविभागीय अधिकारी होते तसेच आकाश अवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भंडारा हे ही उपस्थित होते. तसेच जिल्हयातील माजी सैनिक दिवाण निर्वाण, सखाराम वाठई, विनोद बांते, छगनलाल गायधने,  रामकृष्ण तीतीरमारे, महेश भुरे व बरेच माजी सैनिक तसेच शासकीय कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाध्ये दिवान निर्वाण, माजी सैनिक यांनी कारगील दिवसाबाबत उपस्थितांना माहिती दिली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भंडारा आकाश अवतारे यांनी मानोगत व्यक्त करतांनी सांगीतले की, जुलै १९९९ मध्ये काश्मीर कारगील येथे झालेल्या लढाईतील वीरांच्या कामगिरीचे थोडक्यात वर्णन केले.

सैनिक देशातील जनतेच्या प्राणांचे रक्षण करतात. वीरमाता व विरपत्नी यांच्या घरातील सदस्यांनी देशासाठी सर्वाच्च बलिदान दिले आहे. त्यांना जिवनात अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. त्यामुळे त्यांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात.समाज म्हणून आपली नैतीक जबाबदारी आहे. त्यांच्या जिल्हापातळीवरील किंवा राज्य अथवा केंद्रशासन पातळीवरील कामे तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील व त्यांच्या समस्या वर कार्यवाही होईल अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुधाकर लुटे, वरिष्ठ लिपिक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल कार्यालयातील कर्मचारी  सुरेश घनमारे (कल्याण संघटक), विनोद लांजेवार यांचे अभिनंदन केले.





  Print






News - Bhandara




Related Photos