हैद्राबाद - नागपूर महामार्गावर कार-ऑटोची समोरासोमर धडक ; ५ ठार , १२ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ :
  हैद्राबाद - नागपूर  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सम्राट बार आत्राम पेट्रोल पंप जवळ आज ११ एप्रिल रोजी  दुपारी २ वाजताच्या सुमारास कार-ऑटोची धडक झाली. या अपघातात ५ जण ठार तर  १२ जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
वडकी या गावा जवळील दोन किलोमीटर अंतरावर सम्राट बार आत्राम पेट्रोल पंपाजवळ सदर घटना घडली.   फोर्डफिगो कार (एमएच ३१ डीव्ही १०८७) ची ऑटो क्रमांक  एमएच २९ व्ही ९४९६ ला  समोरासमोर जोरधार धडक बसली . कारची ऑटोला  इतकी जबरदस्त धडक होती की या अपघातात ५ जण जागीच ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये  लहान मुलांचा समावेश आहे. ऑटो मधील प्रवासी हे आजनसर येथे संत भोजाजी महाराज तीर्थस्थळ येथे दर्शनासाठी जात होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.  जखमींवर राळेगाव आणि वडणेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. ऑटो मधील मृत व जखमी हे वडकी जवळील रिदोरा या गावातील आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-12


Related Photos