मतदान करून परतणाऱ्या मतदारांवर काळाचा घाला, ट्रॅक्टर उलटून ३ ठार


- देसाईगंज तालुक्यातील डोंगर मेंढा गावानजीकची घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
   लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान करून परतणाऱ्या मतदारांवर काळाने झडप घातली आहे.   देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परत येताना डोंगर मेंढा गावानजीक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला . या अपघातात ३  जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हिरा राऊत (७०), यमुना मलकाम (६०) ,  रसिक मरस्कोल्हे (६०) अशी मृतकांची नावे आहेत. 
आज दुपारी १ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून ट्रॅक्टर चालक नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. 
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलिवण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरमधून दहा ते बारा जणांना शंकरपूर मतदान केंद्रावर नेण्यात येत होतं. मात्र मतदान झाल्यानंतर पुन्हा घरी परतताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-11


Related Photos