महत्वाच्या बातम्या

 नगर परिषद शाळांचा विषय घेऊन आम आदमी पार्टी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपुर : नगर परिषद शाळांचा विषय घेऊन आम आदमी पार्टी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक दिली.
 २१ जुलै रोजी पुन्हा एकदा शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहरातील नगरपरिषद शाळांमधील प्रश्न सुटले पाहिजे तसेच नगरपरिषद अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या प्री प्रायमरी शाळेत कोणतेही भेदभाव न करता सर्वांना निशुल्क शिक्षण मिळाल पाहिजे व स्वतःच्या नफा पाहणाऱ्या खाजगी शिक्षण संस्था चालकास मिळालेले कंत्राट रद्द करावे या मागणीला घेऊन १० जुलै ला बल्लारपुर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना  निवेदन देण्यात आले होते.

४८ तासात कोणतेही उत्तर किंवा प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे १३ जुलै ला जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी तक्रार करण्यात आली. कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी सुद्धा दोन दिवस मागितले परंतु  त्यांनंतर सुद्धा कोणतेही  प्रतिक्रिया दिसत नसल्यामुळे आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ठोस पाऊले उचलण्याची मागणी करण्यात आले. या प्रश्नी ठोस पाऊले उचलली न गेल्यास पक्षाला आक्रमक भुमिका घ्यावे लागेल असा इशाराही देण्यात आला. परंतु सध्या चंद्रपुर जिल्ह्यातील पूर परिस्थिति पाहता जिल्हाधिकारीनी या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी काही दिवसाचा अवधी मागीतला आहे. 

यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिल्हा संघठन मंत्री प्रा. नागेश्वर गंड़लेवार व भिवराज सोनी, चंद्रपुर शहर महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटिल, बल्लारपुर शहर सचिव ज्योति बाबरे, संघठन मंत्री रोहित जंगमवार, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, भद्रावती शहर अध्यक्ष सूरज शाह, सचिव सुमित हस्तक, इत्यादि उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos