महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१९ जुलै महत्वाच्या घटना

१६९२ : अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.

१८३२ : सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.

१९०० : पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली

१९०३ : मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.

१९४० : दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.

१९४७ : म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.

१९५२ : फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९६९ : भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९६९ : नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

१९७६ : नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

१९८० : मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९९२ : कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.

१९९३ : डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

१९९६ : अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९६९ : १४ बँकांचे राष्ट्रीयकरण

१९ जुलै जन्म

१८१४ : अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.

१८२७ : क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)

१८३४ : फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.

१८९६ : स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)

१८९९ : भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)

१९०२ : कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)

१९०२ : भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)

१९०९ : भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)

१९३८ : सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

१९४६ : रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.

१९५५ : क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म.

१९६१ : भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

१९ जुलै मृत्यू

९३१ : ९३१ई.पूर्व : जपानचे सम्राट उडा यांचे निधन. (जन्म: ५ मे ८६७)

१३०९ : संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

१८८२ : प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)

१९६५ : दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७५)

१९६८ : बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)

१९८० : तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.

२००४ : जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos