महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता विविध पदभरती तसेच स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.१००० ( एक हजार रुपये ) विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते तसेच पोलीस भरती करणा-या उमेदवांराना मैदानी सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज ०१ जुलै २०२३ पासुन २६ जुलै २०२३ पर्यत या कार्यालयात सादर करावेत तदनंतर मुलाखत २७ जुलै २०२३ रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थ‍ित राहावे अधिक माहीतीसाठी कार्यालयाच्या ०७३२-२९५१४३ या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos