महत्वाच्या बातम्या

 विक्रीसाठी आणलेले एशियाटिक सॉफ्ट शेल कासव या दुर्मीळ प्रजातीच्या कासवाची सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथील ठाणेदार जिवन राजगुरु, सहा. पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे मौजा भंगारपेठ येथील संशयीत इसम प्रमोद भगाकर पोटे याचे घरी पंचासमक्ष छापा टाकुन घराची झडती घेतली असता, त्यांच्या घरात एक नग एशियाटिक सॉफ्ट शेल कासव या दुर्मीळ प्रजातीचे कासव विक्रीसाठी बाळगुन असल्याचे दिसून आल्याने त्याला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचे कासव इतर इसम रविद्र व्यंकोजी मडपल्लीवार वय ३५ वर्षे रा. शिवणी देशपांडे ता.गोंडपिपरी याचे कडुन घेतले असल्याचे माहिती दिली आहे. यावरुन इसम प्रमोद भगाकार पोटे, वय ३७ वर्ष, रा. नगारपेठ ता. गोंडपिपरी, रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार वय ३५ वर्ष रा. शिवणी देशपांडे ता. गोंडपिपरी यांना तसेच एक नग रुपये २५ हजार/- रुपये किमतीचा एशियाटिक सॉफ्ट शेल कासव या दुर्मीळ प्रजातीचे कासव ताब्यात घेवुन वन परिक्षेत्र अधिकारी, धाबा परिक्षेत्र ता. गोंडपिपरी यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु हयांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु, पोहवा / १७४२ वंदीराम पाल, पोना / ५७७ अनुप निकुरे, पो/ २११ प्रेम १ नंदकिशोर माहुरकर, पोअं/ ५९४ अनुप निकुरे, पोअं/ २२११ प्रेम चव्हाण पो.स्टे. गोंडपिपरी तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि विनोद भुरले, पोहवा प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार आणि सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मुजावर अली व कार्तीक खनके यांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos