शिर्डी येथून दर्शन घेऊन जात असलेल्या भाविकांची बस मोखाडा घाटात कोसळून ४ ठार, ४५ जण जखमी


वृत्तसंस्था / नाशिक :  शिर्डी येथील दर्शन करून डहाणूकडे जात असलेली भाविकांची  बस  नाशिक - जव्हारा रस्त्यावर  मोखाडा घाटातील दरीत  कोसळली. या अपघातात ४ ठार तर ४५ जण जखमी झाले. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली. जखमी व मृत हे पालघर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते.
बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बस दरीत कोसळल्यानंतर त्वरीत मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.  घटनास्थळी पोलीस व बचाव पथकाने त्वरीत धाव घेतली. अपघाताबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-24


Related Photos