लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान बसमधून दारुसाठा जप्त


- महसूल व पोलिस प्रशासनाची  कारवाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगाव  :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केल्या जात आहे. मारेगाव तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा सीमेलगत कोसरा गावाजवळील टी पॉइंट येथे वडकी वरून वरोरा कडे जाणाऱ्या बसची तपासणी केली असता बॅग मध्ये दारुच्या बॉटल आढळून आल्या. दारूबंदी असणाऱ्या चंद्रपुर जिल्ह्यात अवैध दारू तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले. दोन तरुणांना ताब्यात घेतले असता दारू तस्करी उघड झाली.
 यवतमाळ जिल्ह्यातून दारूबंदी असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू तस्करीवर आळा बसविता आला नाही. बसमधून ५ हजार ४६० रुपये किमतीची २१०  बॉटल देशी दारू  जप्त करण्यात आली   व आरोपी घनश्याम एकनाथ निखाडे व सतिश विजय रासेकर रा. चंद्रपूर याना ताब्यात घेतले.   मुंबई दारुबंदी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार दिलिप वडगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-24


Related Photos