महत्वाच्या बातम्या

 डॉ. दिनेश दुर्योधन व डॉ. योगेश खेडेकर यांचा प्रोजेक्ट राष्ट्रीय पातळीवर : विदर्भातून एकमेव प्रोजेक्टची निवड


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : राजुरा येथील डॉ. दिनेश दिवाकर दुर्योधन आणि बल्लारपूर येथील डॉ. योगेश वसंत खेडेकर यांचा सिन्थेसिस ऑफ डी झायलोस फ्रॉम राईस हस्क या प्रोजेक्टची निवड एम .एस .एम. इ .सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मध्यें झाली आहे. देशभरातून हजारो प्रोजेक्ट पैकी, एम .एस .एम. इ .च्या निकषांच्या आधारे काही निवडक प्रोजेक्टची निवड केली जाते. 

डॉ. राजेश सिंगरू, प्राचार्य ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिनेश दुर्योधन आणि डॉ. योगेश खेडेकर यांच्या संयुक्तिक प्रोजेक्टची निवड झाली. विशेष म्हणजे, निवड झालेल्या प्रोजेक्ट हा विदर्भातील एकमेव आहे. कचऱ्यातुन संपत्ती या विषयाला अनुसरून हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. हॅकथॉन -2 अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत देशभरातून हजारो प्रोजेक्ट पैकी काही निवडक प्रोजेक्ट निवडले जातात त्यापैकी हा एक विदर्भासाठी नावलौकिक करणारा प्रोजेक्ट आहे. ताई गोळवलकर कॉलेज ऑफ सायन्स, रामटेक, नागपूर या केंद्रातून सदर प्रोजेक्टची नोंदणी करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्याच्या कोंड्यापासून अनेक उपयोगी घटक बनविता येतो त्यांतील एक डी -झायलोस बनविण्याचा हा प्रकल्प आहे. डी-झायलोसच्या सहाय्याने काही उपयोगी जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करण्यात येते त्यापैकी प्रामुख्याने मधुमेह रोगावरील रसायनमुक्त औषध तसेच खाद्य सुद्धा बनवता येते, ज्याची जगभरात प्रचंड मागणी आहे. त्याचे अनेक फायदे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकल्पाकरीता केंद्र सरकारकडून आर्थिक मदतही ताई गोळवलकर कॉलेज ऑफ सायन्स, रामटेकला मिळणार आहे. या प्रकल्पाच्या निवडीने  चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन संशोधकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos