महत्वाच्या बातम्या

 जनहिताच्या कामांसाठी संबंधित विभागांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन समस्या सोडवा : आमदार विनोद अग्रवाल


- समस्यांबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेतली बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : पावसाळा सुरू झाला असून, मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. यासोबतच ग्रामीण भागात अनेक विकासकामे सुरू झाली असून, त्यात रस्ते, पाणीपुरवठा पाइपलाइन, अशी अनेक कामे सुरू झाली आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत. यासाठी उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावचे सरपंच व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनच कोणतेही काम करावे असे सांगितले. अनेक गावांमध्ये काही दिवस अगोदर रस्ते बांधले जातात, त्यानंतर त्याच मार्गाने पाणीपुरवठा केला जातो. पायपलाइनचे काम केले जाते. त्यामुळे रस्ते खराब होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. गावातील सरपंच तसेच शहरातील संबंधित विभागाला पूर्व माहिती दिल्याशिवाय कामे सुरू करू नयेत, यासाठी सर्व संबंधित विभागांनी तातडीने संयुक्त बैठक घ्यावी, जेणेकरून कामांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. यासोबतच गरीब कुटुंबांना रेशनसंदर्भातील समस्याही सांगण्यात आल्या, त्यावर संबंधित विभागाने लवकरच समस्या सोडविण्याची प्रतिक्रिया दिली.

रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी खड्डे दुरुस्त करणेही अत्यंत गरजेचे आहे, यासंदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. यासोबतच पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून जलद गतीने काम करण्यात यावे, तसेच जे रस्ते तुटले आहेत ते पूर्वीप्रमाणे तातडीने दुरुस्त करावेत, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. परिसरात अनेक ठिकाणी विकासकामे होत असताना वनविभागाच्या कामांना दिरंगाई होत असून, जनहिताच्या कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी संयुक्त बैठका घेण्यात याव्यात, यासाठी आ. सहकार्याच्या भावनेने काम करा. असे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

या दरम्यान प्रामुख्याने आ.विनोद अग्रवाल उपविभागीय अधिकारी, तहसीलदार शमशेर खान पठान, प्रकाश लांजेवार उपभियंता बांधकाम विभाग, जि.प, गोंदिया, गणवीर कार्यकारी अभियंता प्राधिकरण RFO भालेकर मैडम, बटालियन एसपी गायकवाड, भूपेश तुरकर अभियंता PMJSY, लखन  हरिनखेड़े, राजू ब्राम्हणकर, डेलेंद्र हरिनखेड़े इत्यादी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos