महत्वाच्या बातम्या

 तानबोडी बोटलाचेरू रस्त्याचे काम निकृष्ट दर्जेचे


- संबंधित कात्रटधारवर कारवाई करा : जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील तानबोडी-बोटलाचेरू मार्गाचे काम चालू आहे. रस्त्याचे काम पावसाळ्यात चालू केल्याने सदर रस्त्यांवर पाहिजे त्या प्रमाने काम होत नसून सदर रस्ता किती दिवस टिकाणार आहे. 

रस्ता बनवत असताना, आदि गिट्टटी टाकून त्यानंतर डांबरीकरण करावे. मात्र या पद्दतीने न करता डांबरीकरण करत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने टाकलेली डांबर उखुडुन जात असून सदर रस्ता वाहतूक केल्यावर भेगा पडत आहेत.

त्यामुळे सदर रस्त्यांच्या काम निकृष्ट असून संबंधित विभागानी लक्ष द्यावी व करवाई करावी, अशी मागणी जि.प. माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडावार यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos