महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर परिमंडळामधील २ लाख ८२ स्मार्ट ग्राहकांकडून ३३ कोटी २८ लाखाचा ऑनलाईन भरणा


- राज्यात एक कोटी ११ लाख ५३ हजार ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबिल

- महावितरणच्या ग्राहकांकडून नोव्हेंबर महिन्यात २ हजार २३० कोटींचा भरणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी एकूण २२३० कोटी ६ लाख इतकी रक्कम भरले आहे. प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत मिळते, त्यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. चंद्रपूर परिमंडळामधील एकूण २ लाख ८२ हजार ९७ ग्राहकांनी ३३ कोटी २८ लाख ऑनलाईन पद्धतीने भरले आहेत.
चंद्रपूर मंडळातील १ लाख ४८ ग्राहकांनी २१ कोटी ९६ लाख तर गडचिरोली मंडळातील १ लाख ३३ हजार ग्राहकांनी १२ कोटी भरले.
ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाचे ग्राहक आघाडीवर असून एकूण ४९ लाख २१ हजार ६९३ ग्राहकांनी १ हजार १ कोटी १३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर याखालोखाल पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या ३३ लाख ७५ हजार ४७१ ग्राहकांनी ७५१ कोटी ८५ लाख इतका तर नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या १९ लाख ३३ हजार २५६ ग्राहकांनी २९९ कोटी १५ लाख इतका भरणा केला आहे. याचबरोबर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ९ लाख २३ हजार २८३ इतक्या ग्राहकांनी १७७ कोटी ९६ लाख इतका ऑनलाईन भरणा केला आहे.
वीज ग्राहक संगणक किंवा मोबाईल ॲपच्या मदतीने वीज बिल भरू शकतात. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचतात. ग्राहक मोबाईल ॲप किंवा संकेत स्थळावर चालू किंवा थकबाकीची देयके पाहू शकतात. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे वीजबील भरण्याची सुविधा आहे. ऑनलाइन वीजबील भरल्यास संगणककृत पावतीही ग्राहकाला मिळते. तसेच महावितरणचे मोबाइल ॲप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत असून ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला आपले वीज बिल केंव्हाही आणि कोठूनही भरता येते. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos