आज मार्कंडादेव येथे उमडणार भाविकांचा जनसागर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
विदर्भाची काशी म्हणुन ओळख  असलेल्या चामोर्शी तालुक्यातील  मार्कंडादेव उद्या ४ मार्चपासुन  महाशिवरात्री निमित्त भाविकांचा जनसागर उसळणार आहे.यामुळे ‘हर हर महादेव’ च्या गजराने आसमंत निनादणार आहे. 
मार्कंडादेव येथील यात्रेसह जिल्ह्यात चपराळा, सोमनुर संगम, वैरागड, अरततोंडी, आरमोरी, ठाणेगाव व अन्य ठिकाणी उद्या ४ मार्चपासुन महाशिवरात्रीस प्रारंभ होत आहे. मार्कंडादेव येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचे यात्रास्थळी जत्थे दाखल होत असल्याने देवस्थान प्रशासन, ग्रा.पं. मार्कंडादेव , पंचायत समिती, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व पोलीस विभाग या सर्वांनी जय्यत तयारी केलेली आहे.
 भाविकांना शिवलींगाच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही. तर दुरुनच मुखदर्शन घ्यावे लागणार आहे. यात्रेसाठी गडचिरोली, चंद्रपुर, अहेरी आगारांच्या वतीने मार्कंडादेव देवस्थानपर्यंत बसेस सोडण्यात येणार आहेत.
 ग्रा.पं. मार्कंडादेव च्या वतीने विद्युतव्यवस्था, शुध्द पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पंचायत समितीच्या वतीने महिलांसाठी चेंजीग रुम, १० शॉवरची व्यवस्था, पाणपोई, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  २० सफाई कामगार दररोज यात्रा परिसराचीr स्वच्छता करतील अशी माहिती सभापती आनंद भांडेकर, सरपंचा उज्वलाताई गायकवाड, सचिव सराटे, यात्रा अधिक्षक डी.पी. मोगे यांनी दिलेली आहे.
 रामप्रसाद महाराज जायस्वाल मराठा धर्मशाळा यांच्या वतीने भाविकांना राहण्याची सोय, महाप्रसाद, आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती  धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर सावकार कोंडुलवार, सचिव अशोक तिवारी, कोषाध्यक्ष प्रमोद सावकार वायलालवार आणि सहसचिव केशवराव आंबटकर यांनी दिली.
 आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांना ने - आण करण्यासाठी अ‍ॅम्बुलंसची व्यवस्था, प्रदर्शनी, रुग्णांना भरती सेवा, पाणी शुध्दी करण्यासाठी औषधी ची व्यवस्था अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमके, साईनाथ मंदावार, आर.डी. गव्हारे यांनी दिली.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परीसरात  भाविकांना रांगेत जाण्यासाठी अस्थायी स्वरूपातील बॅरीकेटस्,उन्हापासुन संरक्षणासाठी कापडी  मंडप,  पिण्याचे मुबलक पाणी, ध्वनिक्षेपक यंत्रणा, मार्गदर्शक सुचना फलक, महाप्रसाद, अंध, अपंग, दिव्यांग वा गरोदर माता यांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती  देवस्थान ट्रस्टचे  अध्यक्ष गजाननराव भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड यांनी दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-04


Related Photos