महत्वाच्या बातम्या

 पाचशेहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शासन आपल्या दारी या अभियानाने व्यापक प्रमाणावर नागरिकांना सेवा त्यांच्या दारी दिल्या असून महीला व बालविकास (जिल्हा परिषद ) यांनी 538 लाभार्थ्याना माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसुंगे यांनी दिली. जिल्हयात 15 एप्रिलपासून सुरू झालेल्या या अभियानात नागरिकांना अनेक योजनांचा लाभ त्यांच्या दारात जावून प्रशासनाने  दिले आहेत.


काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ?

मुलींचे जन्मदर सुधारणा करण्यासाठी तसेच महिला शिक्षणाला व सक्षमीकरण प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना प्रारंभ केली होती.माझी भाग्यश्री कन्या योजना 2022 अंतर्गत, आई-वडिलांमध्ये दुसरी मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजनाचा अवलंब केल्यास, नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे 25000-25000 रुपये बँकेत जमा केले जातील.आणि जर एक मुली नंतर कुटुंब नियोजन केले तर 50000 रुपयांचा लाभ मिळतो. या योजनेद्वारे मुलींचे प्रमाण सुधारणे, लिंग निर्धारण आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवणे इत्यादी उद्देश्य ठेवण्यात आली आहेत.






  Print






News - Bhandara




Related Photos