महत्वाच्या बातम्या

 वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनी ठार, तर वडील गंभीर : बल्लारपूर- चंद्रपूर मार्गावरील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर - चंद्रपूर मार्गावरील प्लायवुड फॅक्टरी, सन्मित्र सैनिक शाळेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगी ठार झाली तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना काल 15 जून रोजी सायंकाळी घडली. 

वेदांती युवराज चिंचोलकर वय 21 वर्ष, रा. विसापूर, ता. बल्लारपूर असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव असून, युवराज माधव चिंचोलकर असे गंभीर जखमीचे नाव आहे. वेदांती व तिचे वडील युवराज चिंचोलकर हे दुचाकी एमएच 34 बीएन 5848 ने बल्लारपूर - चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत वेदांतीचा भाऊ कुणाल याच्या 11 वीच्या प्रवेशासाठी गेले. तेथील काम आटोपून राज्य महामार्गाने चंद्रपूरकडे वळले. दरम्यान, अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. अपघातात वेदांती व तिचे वडील गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेतून वेदांती व युवराज यांना चंद्रपूरला शासकीय रुग्णालय येथे उपचारार्थ आणले. त्यावेळी वेदांती हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos