२८ फेब्रुवारीला किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविणार , शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
गडचिरोली जिल्ह्यातील जे शेतकरी सेवा सहकारी  संस्थेचे सभासद झालेले आहेत.परंतु त्यांनी अद्याप किसान क्रेडिट कार्ड खाते उघडलेले नाही.अशा शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड खाते उघडण्याकरीता तसेच ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड खाते उघडलेले आहे.पंरतु त्यांना अद्याप किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आलेले नाही.त्यांना देखील सदर कार्डचे वाटप करण्याकरीता गडचिरोली जिल्हा मध्वर्ती सहकारी बॅकेच्या संबंधित सर्व शाखांमध्ये  २८ फेब्रुवारी  रोजी मेळावे,आयोजित करण्यात आलेले आहेत.
तरी सेवा सहकारी संस्थाच्या सभासदांनी किसान क्रेडिट कार्ड खाते उघडण्याकरीता आपले सेाबत आधार कार्ड,पॅन कार्ड, २  पासपोर्ट,७/१२ उतारा,नमुना ८अ घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बॅकेच्या संबंधित शाखेत उपस्थित राहावे,केंद्र शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या धोरणानुसार पशुपालन,मत्सयवसाय,दुग्धव्यवसाय,कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना खेळते भांडवलाची गरज पुर्ण करणेकरीता अल्प मुदत कर्ज किसान क्रेडिट सुविधेअंतर्गत देण्यात येणार आहे.
सदर कर्जावरीत पिककर्जाप्रमाणे व्याज सवलत देण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील  सेवा सहकारी संस्थाच्या सर्व सभासदांना किसान क्रेडिट कार्ड आवश्यक असल्यामुळे मेळाव्यसाच्या दिवशी उपस्थित राहून लाभ घ्यावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, सहकारी संस्था,गडचिरोली यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-26


Related Photos