महत्वाच्या बातम्या

 रेंगेपार कोठा येथे गाळमुक्त धरण अभियानाच्या कामाला सुरूवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत रेंगेपार (कोठा) (तालुका लाखनी) येथील तलावातुन गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामासाठी अशासकीय संस्था त्रिनेत्र बहूउद्देशीय संस्थेला नियुक्त करण्यात आले आहे.

या कामाच्या उद्घाटनाला कार्यकारी अभियंता अनंत जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष कापगते उपस्थित होते. अवनी ॲपवर गाळमुक्त धरणाच्या कामाची प्रगती अपडेट करण्यात आली. यावेळी सरपंच आनंद मडावी, उपसरपंच अश्वीन काडगारे, खोजीराम बोरीकर, नुतन टिचकुले, पुनम रामटेके, महेश हजारे उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos