महत्वाच्या बातम्या

 १४ जून रोजी चंद्रपुर येथे लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करणार 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक संघटनेच्यावतीने येत्या १४ जून रोजी दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. स्थानिक प्रियदर्शीनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित लोकनेत्या श्रद्धांजली वाहू या ही श्रद्धांजली सभा सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केला आहे. संवाद प्रतिष्ठान या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहे. सह आयोजक म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, यंग चांदा बिग्रेड, शेतकरी संघटना, जनविकास सेना, मनसे, विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस, उलगुलान संघटना, अ.भा. रिपब्लिकन पक्ष, इको प्रो, सर्वोदय शिक्षण मंडळ, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर प्रेस क्लब, श्रमिक पत्रकार संघ, साई ग्रुप आफ इंन्स्टीटयुट, सोमय्या ग्रुप, फिमेल एज्युकेश सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, लोकमान्य टिळक स्मारक समिती, जिल्हा बार असोसिएशन, एमआयडीसी असोसिएशन, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, इंडियन मेडिकल असोसिएशन, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, भूमिपुत्र बिग्रेड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, फेडरेशन ऑफ ट्रेड कामर्स असोसिएशन, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अखिल भारतीय सरपंच संघटना, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, चंद्रपूर व्यापारी मंडळ, बहुजन मेडिको असोसिएशन, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अखिल भारतीय सरपंच संघटना, इंटक आदी संघटना, राजकीय पक्षांचा समावेश आहे. या श्रद्धांजली सभेला सर्वपक्षीय नेत्यांसोबत धानोरकर कुटुंबीय उपस्थित राहतील.





  Print






News - Chandrapur




Related Photos