देसाईगंज तालुक्याला वादळी पाऊस, गारपिटीने झोडपले : जनजीवन विस्कळीत


- रब्बी पिकांना जबर फटका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
गौरव नागपूरकर / देसाईगंज
: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे आज १५  फेब्रुवारी  रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वादळी पावसासह टपोरी गारपिट झाल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच सध्या स्थितीतील रब्बी हंगामाला जबर फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे. 
        वादळी पावसास झालेल्या गारपिटीचा ओघ इतका प्रचंड होता की अगदी काही वेळातच रस्त्यावर गारांचा थर तयार झाला.दरम्यान पडणाऱ्या टपोऱ्या  गारांमुळे परिसरातील गहु, चना,लाख,लाखोरी तुर या रब्बी पिकांसोबतच लावण्यात आलेल्या टरबूज व भाजीपाला पिकालाही जबर फटका बसला आहे. 
      उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरवशावर लावण्यात आलेल्या धान पिकालाही जबर फटका बसला असुन गारपिटीमुळे अनेकांचे पऱ्हे  जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कौलारु घरांना गारपिटीचा जबर फटका बसला असुन मोठ्या प्रमाणात कौलांची नुकसान होऊन घरात पावसाचे पाणी शिरल्याने वेळेवरच अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. वादळी पावसासह जवळपास अर्धा तास झालेल्या गारपिटी मुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले असले तरी वृत्त लिहीस्तोवर तालुक्यात एकही अनुचित घटना घडल्याची बाब समोर आलेली नाही.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-15


Related Photos