महत्वाच्या बातम्या

 महात्मा फुले विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता 50 टक्के अनुदान योजनेंतर्गत व बिजभांडवल योजनेंतर्गत 80 टक्केचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांस अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जदार अनुसूचित जाती मधील महार, बौध्द, खाटीक, डुमार, मेहतर, भंगी या घटकातील असावा. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला, व्यवसायाचे कोटेशन, शाळा सोडल्याचा दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्र दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे, असे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos