महत्वाच्या बातम्या

 मुंबई : प्लास्टीक बाटलीपासून पालिका बनविणार टी-शर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : प्लास्टिक बॉटलपासून शहरात होणारे वाढते प्रदूषण पाहता, हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक बॉटलपासून पालिका टी-शर्ट आणि बेंच बनविणार असून वरळी, लोअर परळ येथील उद्यानांत पालिकेने प्लास्टिकची विल्हेवाट लावणारी मशिन लावली आहेत. लवकरच मुंबईतील इतर उद्यानांतही अशा प्रकारची मशिन बसविण्यात येणार आहेत.

५ जून रोजी पालिकेच्या माध्यमातून पर्यावरण दिन साजरा केला जाणार असून, याचाच भाग म्हणून पालिका रिसायकल इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून या मशिन बसविणार आहेत.

- या मशिनची किंमत पाच लाख रुपये असून, पालिका सामाजिक संस्थेसह सीएसआर प्रकल्पातून हे काम करणार आहे. 

- पालिकेच्या वरळी येथील भगवान बुद्ध, लोअर परळ येथील विलास विठोबा शिंदे या उद्यानात ही मशिन बसविण्यात आली आहेत.

- एका मशीनद्वारे सुमारे दोन हजार बाटल्यांची विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर विल्हेवाट लावलेल्या प्लास्टिकपासून टी शर्ट, बेंच बनविले जातात, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.





  Print






News - Rajy




Related Photos