महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष



३० मे महत्वाच्या घटना

१५७४ : हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.

१६३१ : पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.

१९३४ : मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.

१९४२ : दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.

१९७४ : एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.

१९७५ : युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.

१९८७ : गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

१९९३ : पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

१९९८ : अफगाणिस्तान मधील ६.५ मेगावॅट क्षमतील भूकंपात ४००० ते ४५०० लोक ठार झाले.


३० मे जन्म

१८९४ : इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९६९)

१९१६ : अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ – मुंबई)

१९४९ : इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म.

१९५० : अभिनेते परेश रावल यांचा जन्म.


३० मे मृत्यू

१४३१ : फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी १४१२)

१५७४ : फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १५५०)

१७७८ : फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १६९४)

१९१२ : आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८६७)

१९४१ : थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)

१९५० : प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन.

१९५५ : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: ५ जून १८७९)

१९६८ : चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)

१९८१ : बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या. (जन्म: १९ जानेवारी १९३६)

१९८९ : शिख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)

२००७ : भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos