महत्वाच्या बातम्या

 संसद भवनाच्या उद्घाटनावेळी ७५ रुपयांचे नाणे जारी होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ७५ रुपयांचे नाणे जारी करण्यात येणार आहे. २८ मे रोजी होणाऱ्या या समारंभात हे नाणे जारी करण्यात येईल. या नाण्यावर नवीन संसद भवनाचे चित्र असेल.

त्याखाली २०२३ हे त्या नाण्याचे जारी झालेले वर्षंही कोरण्यात आले आहे. त्यावर हिंदीत संसद संकुल आणि इंग्रजीत पार्लमेंट कॉम्प्लेक्स असे शब्द कोरलेले असतील. त्यावर अशोक चिन्हही अंकित केलेले असेल.

या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम इतके असेल. त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे आणि ५-५ टक्के निकेल आणि झिंक धातूचं मिश्रण असेल. त्याचा व्यास ४४ मिमी इतका असेल तर नाण्याच्या कडेवर २०० सेरेशन असतील. या नाण्याचं डिझाईन संविधानाच्या पहिल्या अनुसूचित नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार करण्यात आले आहे.

उद्धाटन सोहळा हा यज्ञ आणि पूजेने सुरू होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा कक्षाचे औपचारिक उद्घाटन करणार आहेत. यावेळी शैव संप्रदायाचे महायाजक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेन्गोल हा राजदंड सोपवतील. या राजदंडाला नवीन संसद भवनात लोकसभा अध्यक्षाच्या आसनाजवळ स्थापित करण्यात येईल.





  Print






News - Rajy




Related Photos