महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२३ मे महत्वाच्या घटना

१७३७ : पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.

१८२९ : सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.

१९४९ : पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.

१९५१ : तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.

१९५६ : आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.

१९८४ : बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

१९९५ : जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.

१९९७ : माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.


२३ मे जन्म

१०५२ : फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)

१७०७ : स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)

१८७५ : अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)

१८९६ : गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७७)

१९१८ : इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)

१९१९ : जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)

१९२६ : मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)

१९२६ : भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)

१९३३ : मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.

१९४३ : पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.

१९४५ : भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)

१९५१ : रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.

१९६५ : क्रिकेटपटू वूर्केरी रमण यांचा जन्म.


२३ मे मृत्यू

१८५७ : फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)

१९०६ : नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)

१९३७ : रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)

१९६० : निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)

२०१४ : भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)

२०१४ : भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे १९५१)





  Print






News - todayspecialdays




Related Photos