राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा विजेता ठरला नागपूर विभाग तर नाशिक विभाग उपविजेता


- बक्षीस वितरणाच्या शानदार सोहळयाने क्रीडा महासंग्रामाचा समारोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे आयोजन  २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर करण्यात आले. या क्रीडा स्पर्धाचा शानदार समारोप व बक्षीस वितरण सोहळा ३१ जानेवारी रोजी जिल्हा प्रेक्षागार मैदानावर सायंकाळी ५ वाजता पार पडला. बक्षीस वितरण भारत सरकार आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सचिव दिपक खांडेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. नागपूर विभाग सर्वाधिक ४२८ गुण घेवून विजेता तर नाशिक विभाग ३७६ गुण घेवून उपविजेता ठरला.

मार्गदर्शन करताना भारत सरकार च्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सचिव दिपक  खांडेकर म्हणाले,   गडचिरोली सारख्या दुर्गम भागात इतका दिमाखदार सोहळा  आयोजित होउ शकतो हे पाहून मला मनापासून अती आनंद झाले. सुरुवातीला मला शंका होती पण या शानदार आयोजनाने राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे आयोजन करण्याची क्षमता गडचिरोली जिल्हयामध्ये आहे हे आज सिदध झाले आहे. आपण असेच विभागाचे व राज्याचे पर्यायाने देशाचे नाव रोशण  करावे, अशी मी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो. जीवनात बरीच मोठी आव्हाने असतात. परंतू या आव्हानांना न घाबरता धैर्याने सामोरे गेल्यास यश प्राप्त होते. बक्षीस आपली वाट पाहात राहते, गरज असते फक्त अथक परिश्रमाची , असे ते म्हणाले. 
या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा होत्या.  प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, नाशिकचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे,  गोंडवाणा विद्यापीठ गडच‍िरोलीच्या क्रीडा संचालिका डॉ. अनिता लोखंडे, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपायुक्त विनोद पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रादीप शिंदे उपस्थित होते.
या क्रीडा संमेलनात राज्यातील नाशिक, नागपूर, अमरावती व ठाणे या चार विभागातील एक हजार सातशे सत्तावन खेळाडूंनी १४ , १७ व १९ वर्षे वयोगटात कबडडी, खोखो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल या सांघिक तसेच लांब उडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आद‍ी वैयक्तिक खेळातून आपले कौशल्य सीद्ध केले.या स्पर्धेचे उद्घाटन २९ जानेवारीला थाटात व रंगतदार सोहळयात झाले होते. विजेता संघाला चषक देवून गौरविण्यात आले.मागील वर्षी मिशन शौर्य १ अंतर्गत माउंट एवरेस्ट सर करणा-या चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांचा  याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवाडा शासकीय आश्रमशाळेतील मनीषाधुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडावी व जिवती शासकीय आश्रमशाळेतील कविदास काठमोडे व विकास सोयाम या ५ विद्यार्थ्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले होते.तसेच मिशन शौर्य २  अंतर्गत चारही विभागातील प्रशिक्षण घेतलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
 याप्रसंगी आमदार डॉ. होळी म्हणाले की, मी पण शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेवून वैद्यकीय अधिकारी व आमदार झालो. खेळाडूने खेळाडूवृत्तीने खेळावे. आश्रमशाळा व वस्तीगृहाच्या सुधारणेकडे शासनाचे विशेष लक्ष असून आदिवासी विकास विभागाचे मंत्री व अधिकारी योग्य दिशेने कार्य करत आहेत. 
 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खेळासोबत शिक्षणाकडे विशेष लक्ष  द्यावे.
 आपल्या अध्यक्षीय भाषणात मनिषा वर्मा म्हणाल्या, विभागाती लखेळाडूंचे क्रीडा कौशल्यसोबतच सांस्कृतिक गुण पाहून मी आनंदीत झाली. आदिवासी विकास नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी अथक परिश्रमाने हे क्रीडा संमेलन यशस्वी करून दाखविले व डॉ. सचिन ओंबासे यांनी उत्कृष्टपणे नियोजन केल्याने मी सर्वांचे अभिंनंदन  करते.
 समारोपीय कार्यक्रमाचे अहवाल वाचन चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर यांनी  केले. संचालन जवाहर गाढवे व अनिल सोमनकर  यांनीकेले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी  आभार  मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर, आर. के. लाडे, आर. एम. पत्रे, वंदना महल्ले, कार्यालय अधिक्षक  डी. के. टिंगुसले, रामेश्वर निंबोळकर, विभागीय क्रीडा  समन्वयक संदीप  दोनाडकर, प्रभू  साधमवार, किशोर  तुमसरे, सुधीर  शेंडे, मदन  टापरे, सुधाकर  गौरकर, प्रमोद वरगंटीवार, प्रवीण  तुरानकर, सुभाष  लांडे, मुकेश  गेडाम, प्रमिला  दहागावकर, मंगेश  ब्राहमणकर, सतिश  पवार,सुधीर  झंजाळ, व्यंकटेश  चाचरकर, अनिल  बारसागडे, विनोद  चलाख, अश्विन  सारवे, आशिष   नंदनवार, रामचंद्र  टेकाम, विनायक  क्षीरसागर  व नागपूर  विभागातील  संबंधित  अधिकारी व कर्मचा-यानी  परिश्रम  घेतले.     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-01


Related Photos