‘द बर्निंग बस’, गडचिरोली आगारात उभ्या बसने घेतला पेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :  
 आज २६ जानेवारी रोजी गडचिरोली आगारात उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यामध्ये कोणतीही जिवितहाणी झाली नाही. मात्र बस ७० टक्के जळाली आहे. या घटनेमुळे बसस्थानकात उपस्थित प्रवाशांना ‘द बर्निंग बस’ चा थरार अनुभवास आला.    
आज सायंकाळी ७.३०  वाजताच्या सुमारास एक बस आगारात आली. बस उभी करून चालक - वाहक निघून गेले. काही वेळानंतर या बसने अचानक पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे बस ७० टक्के  जळाली.  अधिकाऱ्यांनी तातडीने अग्नीशमन दलास पाचारण केले. अग्नीशमन दलाने तातडीने आगार गाठून आग आटोक्यात आणली. सुदैवाने ही बस रस्त्यावर असताना पेट घेतली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या बसमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-26


Related Photos