महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१३ मे महत्वाच्या घटना

१८८० : थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.

१९३९ : अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.

१९५० : फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.

१९५२ : भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.

१९६२ : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्‍न.

१९६७ : डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.

१९७० : नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

१९९५ : ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.

१९९६ : ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.

१९९६ : लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

१९९८ : भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे केली.

२००० : उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

२००० : भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.

१३ मे जन्म

१८५७ : हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९३२ – लंडन, यू. के.)

१९०५ : भारताचे ५वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९७७)

१९१६ : भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत यांचा जन्म.

१९१८ : भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८४)

१९२५ : दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००४)

१९५१ : भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म.

१९५६ : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा जन्म.

१९५६ : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा जन्म.

१९७३ : गीतलेखक, कवी संदीप खरे यांचा जन्म.

१९८४ : भारतीय गायक बेनी दयाल यांचा जन्म.

१३ मे मृत्यू

१६२६ : अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचे निधन.

१९०३ : फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलिनेरियो माबिनी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८६४)

१९५० : प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)

२००१ : लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)

२०१० : कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७ – मणेराजूरी, सांगली)

२०१३ : भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos