महत्वाच्या बातम्या

 मुलभूत सोयी सुविधा उभारणे प्राथमिक उदिष्ट : माजी मंत्री राजकुमार बडोले


- अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवनितपुर, कोरंभी, तिडका/करड येथे २ कोटी ८४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपुजन माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यामध्ये नवनितपुर गाव अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम, सार्वजनिक स्वच्छता गृहाचे बांधकाम, विंधन विहीर मार्फत पाण्याची सोय करणे, कोरंभी येथे जलजिवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ता बांधकाम, तिडका येथे जलजिवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना इत्यादी कामे करण्यात येणार असून मुलभूत सोयी सुविधा उभारणे प्राथमिक उदिष्ट असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. 

गावाच्या विकासासंदर्भात होत असलेल्या मागण्या विचारात घेऊन त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने आज नवनितपुर, कोरंभी, तिडका/करड हे गाव विकासाकडे जात असल्याबाबत आनंद व्यक्त करत असल्याचे सुतोवाच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. दरम्यान उपस्थितांशी संवाद साधत असतांना नागरिकांनी आणखी काही कामांची मागणी केली असता येत्या काळात निधी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विजय कापगते, जिल्हा परिषद सदस्या जयश्री देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा ढेंगे, पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाणे, प्रमोद लांडगे, एस.आर. देशमुख, संजय खरवडे, पराग कापगते, सुरेश टेंभुर्णे सरपंच कोरंभी, मोहन साखरे सरपंच नवनितपुर, बबिता उइके सरपंच तिडका, दिपाली शेंडे उपसरपंच कोरंभी, सुनिल कुरसुंगे, उपसरपंच नवनितपुर, आसाराम मेश्राम उपसरपंच तिडका, हेमलता शेंडे, स्नेहल आकरे, बाबुलाल राऊत, नानाजी आकरे नवनितपुर, कोरंभी, तिडका/करड येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Gondia




Related Photos