आरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीत सहा उमेदवारांनी घेतली माघार


- नगरसेवक पदासाठी ९८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
- नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार कायम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
स्थानिक नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केलेल्या एकूण १३९ उमेदवारांपैकी ३५ नामांकन अवैध ठरले होते. आता सहा उमेदवारांनी नामांकन मागे घेतले असून नगरसेवक पदासाठी ९८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
नगराध्यक्षपदासाठी १० नामांकन दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन नामांकन छाणणीत अवैध ठरले होते. यामुळे ८ उमेदवार उरले होते. या आठपैकी एकानेही नामांकन मागे घेतले नाही. तर नगरसेवक पदासाठी छाणणीनंतर उरलेल्या १०४ उमेदवारांपैकी सहा जणांनी नामांकन मागे घेतले आहे. 
यामध्ये प्रभाग क्रमांक १ ब मधून भाउराव तलमले, प्रभाग क्रमांक ४ अ मधून जयश्री प्रेमलाल सयाम, प्रभाग क्रमांक ६ अ मधून शालु रविंद्र इंदूरकर, प्रभाग क्रमांक ६ अ मधून योजना सुरेश मेश्राम, प्रभाग क्रमाक ६ ब मधून देवानंद कवडूजी दुपारे  आणि विजय श्रीधर सुपारे यांचा समावेश आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आकाश रामकृष्ण मडावी, पवन दिलीप नारनवरे, सुरज महादेव नारनवरे, तेजेश श्रीराम मडावी, विजय तुकाराम बगडे, शरद यादवराव सोनकुसरे, विनोद बळीराम वरठे, छगण पुनाजी शेडमाके हे उमेदवार आहेत. 

उद्या होणार चिन्हवाटप

आरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी आज १७ जानेवारी रोजी नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी नगरसेवकपदासाठी असलेल्या ६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता उर्वरीत उमेदवारांना उद्या १८ जानेवारी रोजी चिन्ह वाटप केले जाणार आहे. यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-17


Related Photos