महत्वाच्या बातम्या

 भीषण अपघात : दुचाकीला बसची जोरदार धडक, दोन जण जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : राजुरा - गडचांदूर मार्गावर पांढरपौनी नजिक भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
काल २ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पांढरपौनी जवळील नाल्या शेजारी असलेल्या एन एन ग्लोबल कोल वाशरिज येथील कामगार संदीप सिंह वय ३० वर्ष व दुसरा एक कामगार आपल्या दुचाकीने पांढरपौनी येथे परत जात असताना राजुरा येथुन पालगाव येथे जाणारी बस क्र एम एच ०७ सी ९५३८ ह्या बसने जोरदार धडक दिल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.


प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार राजुरा कडून बस येत असतानाच दुचाकीस्वार अचानक पांढरपौनी गावाच्या मार्गावर वळले. समोर अचानक दुचाकी आल्याने बस चालकाने ब्रेक मारला व बस बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नात बस रस्ता सोडुन नालीत अडकली मात्र दरम्यान बसची दुचाकीला धडक लागल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाले. मात्र सुदैवाने बस मधील प्रवाशी सुरक्षित असुन कोणालाही दुःखपत झाले नाही.





  Print






News -




Related Photos