महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री कधी देणार पीकविम्याची रक्कम : भरपाईची विमा रक्कम मिळवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / खांबाळा : वरोरा तालुक्यातील शेतकरी अद्याप अतिवृष्टि, अस्मानी संकटातुन सावरलेला नसतांना पीक विमा कंपनीच्या वतीने शेतकरी बांधवाना मोठा आर्थिक फटका दिला गेला आहे. 

विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून करोडो रूपयाची माया जमवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे 

विशेषता सध्या राज्यभर पीक विम्याचा विषय गाजत असतांना लोकप्रतिनिधी मात्र काहि बोलायला तयार नाहित, खुप मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांना कृषी विभाग व मोदिसरकारने पीकांचा विमा उतरविण्यास सांगितले आणि शेतकऱ्यांनी उसणेवाडी करून उतरवून सुद्धा घेतला. आता पीक विमा देण्याची वेळ आली तर प्रत्येकजण आप - आपली जबाबदारी ढकलतांना दिसुन येत आहे. त्यामुळेच राज्यसरकारवर शेतकरी बांधव नाराज होत आहेत, हि पीकविमा कंपनी फक्त विमा कंपण्याना नफा कमवण्यासाठिच स्थापन करण्यात आल्याचा सुर शेतकऱ्यांमधून  उमटत आ. संबंधित जबाबदार यंत्रणेकडून या विषयात विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरताना दिसते.

काही पीकविमा धारक शेतकऱ्यांना विम्याच्या तुंटपुज्या रक्कमा देण्यात आल्या, तर कित्येक शेतकऱ्यांना आजतागायत रुपया सुद्धा देण्यात आला नाही. 

अतिवृष्टि व पुरामुळे वरोरा तालुक्यातील पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात खांबाळा विभागात नुकसानीचे प्रमाण जास्त असल्याने संबंधित तलाठ्यानी पंचनामे सुद्धा केले. तरी नुकसान भरपाई दिली नाही. अनेक विरोधी पक्षातील राजकीय पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना घेवून तहसील कार्यालया समोर आंदोलने केली, पण त्याचा काहीच मात्र उपयोग झाला नसल्याचे दिसते.  आशा या मुजोर शासनाला जाग अद्यापही आली नाही. आता एका महिण्यावर खरिप हंगाम येणार आणि आता पर्यंत पीकविमा कंपनीने विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. 

याबाबत या मतदार संघाच्या आमदाराने जोरदार पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागे करून विमारक्कमेची आठवण करून द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवातून जोर धरत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos