इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तयार केले पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन


-  १३ वर्षांपर्यंत होणार नाही महिलांना गर्भधारणा 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली :
  पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने हे इंजेक्शन तयार केले आहे. या इंजेक्शनचा वापर करणाऱ्या पुरुषांमुळे १३ वर्षांपर्यंत महिलांना गर्भधारणा होणार नाही.  तसेच नसबंदीचे ऑपरेशन करण्याची गरज पुरुषांना पडणार नाही. 
 आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आर. एस. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या इंजेक्शनमध्ये वापरलेल्या रसायनामुळे वीर्यातील गर्भनिर्मिती करणारी सत्व कमी होतात. हे इंजेक्शन त्याच नसांना दिले जाते ज्यामध्ये जीवाणुंची निर्मीती आहे. गर्भाशयात वीर्य शिरल्यानंतर ते फाटते आणि गर्भधारणा होत नाही. आयआयटी खरगपूरच्या एका शास्त्रज्ञांनी या रसायनाचा शोध लावला आहे. या इंजेक्शनचा शोध सर्वप्रथम एका उंदरावर करण्यात आला होता. नंतर तो एका सशावर करण्यात आला. दोन्ही प्राण्यांवर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ३०३ पुरुषांवर हा प्रयोग करण्यात आला. ९५ टक्के लोकांच्या बाबतीत हे इंजेक्शन यशस्वी झालं आहे तर ५ टक्के लोकांवर या इंजेक्शनचा काहीच परिणाम झाला नाही.   या इंजेक्शनचा अहवाल आयसीएमआरने आरोग्य मंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे. या इंजेक्शननंतर पुन्हा जर उत्पादनक्षम व्हायचं असेल तर काय करावं यावर आम्ही आता अभ्यास करत आहोत अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.  Print


News - World | Posted : 2019-01-14


Related Photos