महत्वाच्या बातम्या

 मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी


- सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लबने  मुख्याधिकारी, नगर परिषद यांना दिले निवेदन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब ने मुख्याधिकारी, नगर परिषद यांना निवेदन देऊन केले आहेत.  

बल्लारपूर शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे रहदारीला त्रास होत असतो. तसेच मोकाट कुत्र्यांचा हैदास वाढले असून मागील महिन्यात गांधी वार्डत कुत्र्याने एका लहान मुलीच्या गालाचे लचके तोडले होते. त्यात तिला ऑपरेशन करून १६ टाके लागले होते. 

शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत व गायींना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत तसेंच शहरातील उघडे गटारावर झाकण  लावण्याबाबत सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे नगरपरिषद येथील मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, श्रीनिवास पिसार, सुधाकर सिक्का, नारायण सुक्का, कमल वर्मा, शुभम घिवे, चुटकू आदी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos