महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिक, विधवा व अवलंबितांची निवृत्तीवेतन समस्या सोडविण्यासाठी डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीमचे आगमन


- माजी सैनिक, विधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांना उपस्थित राहण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व पेन्शनधारक अवलंबित यांच्या निवृत्तीवेतन विषयी समस्यांचे निवारण, स्पर्श, पीसीडीए संबंधी आणि अडचणीची समस्या सोडविण्याकरीता २४ व २५ एप्रिल २०२३ ला, सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, चंद्रपूर येथे डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीम येणार आहे.

तरी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावे. अधिक माहितीकरीता ०७१७२ -२५७६९८ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे (निवृत्त) यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos